Bhosari crime News : शतपावली करणाऱ्या तरुणाला मद्यपींची मारहाण

एमपीसी न्यूज – रात्रीच्या जेवणानंतर घराजवळ शतपावली करत असलेल्या एका तरुणाला दारूच्या नशेत आलेल्या दोघांनी विनाकारण बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री साडेआठ वाजता जय महाराष्ट्र चौक, गुळवे मैदान भोसरी येथे घडली.

सोहेब रज्जाक मन्सुरी (वय 21, रा. जय महाराष्ट्र चौक, आळंदी रोड, भोसरी. मूळ रा. नंदुरबार) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुक्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा मित्र ऋषिकेश संजय खोरे हे घराजवळ शतपावली करत होते.

त्यावेळी तिथे दारूच्या नशेत आलेल्या दोन आरोपींनी त्यांना लाकडी बांबूने मारहाण केली. यात फिर्यादी यांच्या दाताला दुखापत झाली. त्यानंतर तिथून पळून जात असताना आरोपींनी फिर्यादी यांना कोयता फेकून मारला.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.