Pune News : अखेर दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 29 एप्रिलपासून दहावी, 23 एप्रिलपासून बारावीची परीक्षा

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या यंदाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान आहे. तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे.

या दोन्ही परीक्षांच्या वेळापत्रकाची विद्यार्थ्यांसह पालकांना प्रतिक्षा होती. या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 व दुपारी 3 ते सायंकाळी 6 या दोन सत्रात होणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.