Talegaon News : कान्हेवाडीचे सरपंचपदी भाऊसाहेब पवार बिनविरोध

एमपीसी न्यूज – आदर्श गाव कान्हेवाडी(तर्फे चाकण) चे सरपंचपदी आदर्श सरपंच पुरस्कार विजेते नवनाथ उर्फ भाऊसाहेब एकनाथ पवार यांची तर उपसरपंचपदी राहुल वरसू येवले यांची बिनविरोध निवड झाली.

ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. सरपंचपदासाठी नवनाथ तथा भाऊसाहेब एकनाथ पवार व उपसरपंचपदासाठी राहूल वरसु येवले यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

निवडणूक अधिकारी म्हणून विजय पडवळ यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक अरुण हुलगे व भाग्यश्री येवले यांनी सहकार्य केले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य अनिल आत्माराम कडलक, सुवर्णा राजेंद्र ढोरे, ओमेश्वरी भूषण ढोरे, आरती राहूल खैरे व स्वाती प्रभाकर येवले उपस्थित होते.

सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे.

निवडीनंतर ग्रामस्थांनी पेढे वाटप करुन आनंद व्यक्त केला. तर नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा. पं. सदस्यांचा ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील राजेश येवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.