Jasprit Bumrah : क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह अडकला लग्नाच्या बेडीत
एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ॲंकर आणि मॉडेल संजना गणेशन हिच्याशी विवाहबद्ध झाला आहे. जसप्रीतने सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर केला आहे. या नवविवाहीत जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
जसप्रीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने ‘आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे’ या आशयाचे कॅप्शन त्याने दिले आहे.
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या व अखेरची कसोटी खेळला नाही. बुमराहने लग्नाची गोड बातमी देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.