Educational News : वाकडचे सेसमे स्ट्रिट आता झाले ‘किडोनिया’ ; लॉकडाऊनचा गॅप भरून काढण्यासाठी ‘ब्रश अप प्रोग्राम’

एमपीसी न्यूज – एक दशकापासून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वाकडमध्ये सेसमे स्ट्रिट हे प्रिस्कूल यशस्वीरित्या सुरु आहे. सेसमे स्ट्रिटचे आता ‘किडोनिया’ असे नामांतर करण्यात आले आहे. नवीन नावासह स्कूल नव्या प्रशस्त जागेत हलवण्यात आले आहे. ‘किडोनिया’ स्कूलची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, लॉकडाऊनचा गॅप भरून काढण्यासाठी ‘ब्रश अप प्रोग्राम’ देखील सुरू केला आहे.

लहान मुलांना योग्य वयात त्यांच्या विचार व कृतीला दिशा देणं आवश्यक असते. किडोनिया गेल्या एक दशकापासून वाकडमध्ये दर्जेदार शिक्षण आणि डे केअरची सुविधा पुरवत आहे. अनुभवी शिक्षक आणि पोषक वातावरण यामुळे पालक देखील किडोनियाला पसंती देतात. आत्तापर्यंत किडोनियामधून जवळपास एक हजार विद्यार्थ्यांचे डे केअर आणि शिक्षण पूर्ण झाले आहे.

कोरोना संसर्गाचा विचार करता शाळा आणखी प्रशस्त जागेत हवलण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. नव्या परिसरात जवळपास सात हजार चौरस मीटर एवढी जागा मैदानासाठी राखीव असून खेळ आणि विविध ॲक्टिव्हीटी यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. पहिल्या इयेत्तेसाठी किडोनियाचे सहा शाळांसोबत टाय अप आहे. त्यामुळे मुलांचा पुढचा शैक्षेणिक प्रवास देखील सोपा होतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे काहीजणांचे शैक्षेणिक नुकसान झाले आहे. हा गॅप भरून काढण्यासाठी संस्थेने ‘ब्रश अप प्रोग्राम’ तयार केला आहे. हा प्रोग्राम मुलाचे एक वर्षाचे शैक्षेणिक नुकसान भरून काढेल. वाकड आणि रावेत या दोन्ही शाखेत हा प्रोग्राम उपलब्ध आहे.

प्रत्येक मुल खास आहे. त्यांच्या उपजत गुणांना पारखून त्यांची आवड जोपसन्याचा याठिकाणी प्रयत्न केला जातो. मुलांचा सर्वांगीण विकास आणि त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. शाळेत शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर ठरलेलं आहे त्यामुळे प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने प्रवेशप्रक्रिया सुरू आहे.

Contact info :

Website link:

Home Page

Wakad Ravet Branch Ph no : 7920599909
Address : S no 177/2, Near Samrat Chowk, Yamuna Nagar, Datta Mandir Rd, Wakad, Pune, Maharashtra 411057

Ravet Branch Ph no : 8408822022
Address : Sahara Apartment, Ground Floor Sector no. 29, D-Mart Road, Near Bhondve Chowk, Shinde Vasti Ravet, Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra 411044

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.