Blood Donation News : रक्तदान हेच श्रेष्ठदान ! युवा सेनेच्या शिबिरात 105 पिशव्या रक्तसंकलन

Yuva Sena blood donation camp

एमपीसीन्यूज : सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर रावेत येथे युवा सेनेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला दात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 105 पिशव्या रक्त संकलित झाले.

युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी दीपक शरद भोंडवे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. रावेत येथील शिंदे वस्ती-गणेश मंदिर या ठिकाणी आयोजित शिबीरास शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शिवसेना चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, युवा सेना उपतालुकाधिकारी विशाल दांगट, देहूरोड सल्लागार देवा कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, बाळसाहेब वाल्हेकर, दिलीप भोंडवे, नवनाथ भोंडवे, अनिल भोंडवे, बाळासाहेब भोंडवे, शरद भोंडवे, लहू ठाकूर, राहूल भोंडवे, दत्तात्रय भोंडवे आदींनी भेट दिली.

कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला. रक्ताची टंचाई दूर व्हावी तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भोसरी येथील संजीवनी ब्लड बँकेच्या सहकार्यातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यास तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे समाधान लाभल्याचे दीपक भोंडवे यांनी सांगितले.

युवा सेनेचे रोहित घाग, गणेश भोंडवे, गणेश जुनवणे, तुषार ठाकूर, सागर भोंडवे, सोमनाथ भोंडवे, अलंकर भोंडवे, रामेश्वर भोंडवे, सुजित भोंडवे, शुभम भोंडवे, आकाश ढवळे, सागर शिंदे, सुधीर कुंभार, अनिल तांबे दीपक सुखम, सचिन भोंडवे, बावबुराव थोरात आदी कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

संवेदनशील तरुण म्हणून रक्तदान करणं ही आपली जबाबदारी आहे. आपण केलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचू शकतो. जसा एक जवान देशाच्या रक्षणासाठी आपलं रक्त सांडतो तसंच आपलं रक्तही कुणाला तरी जीवदान देऊ शकतो, ही जाणीव प्रत्येकाच्या मनात निर्माण होणे गरजेचे आहे.

दीपक शरद भोंडवे : उपजिल्हाधिकारी, युवा सेना.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.