Dapodi News: महापालिकेत युवा सेनेचे जास्तीत-जास्त नगरसेवक असतील – राजेश पळसकर

एमपीसी न्यूज – 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवणूक आहे. त्यानुसार शहर युवा सेनेचे काम सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीनंतर युवासेनेचे जास्तीत-जास्त नगरसेवक सभागृहात असतील असे मावळ लोकसभा मतदारसंघाचे युवा सेना विस्तारक राजेश पळसकर यांनी सांगितले.

पिंपरी युवासेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमित्त दापोडीत आयोजित रक्तदान शिबिराचे राजेश पळसकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे, युवासेना चिंचवडचे युवा अधिकारी माउली जगताप, पिंपरी युवासेना समन्वयक रवी नगरकर, सामाजिक कार्यकर्त्या शिला जाधव, जेष्ठ नागरिक रामभाऊ शिंगोटे, प्राजक्ता कांबळे, महिला विभाग संघटिका कोमल जाधव, किरण पिंपळे, अस्मिता कांबळे, संजय गरुड, रवी कांबळे , प्रभाकर हिंगे, यलप्पा वालदोर, मनोज काची, चिंचप्पा नींडोळ, अथर्व शिंदे, टॉनी मकासरे, अविराज जाधव, स्वप्निल शेवाळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.