Maval : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथे रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – देशाचे नेते, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (Maval)राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

शिबीरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामाजिक भान लक्षात घेत हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास पोटोबा देवस्थान मुख्य विश्वस्त (Maval)सोपानराव म्हाळस्कर, विश्वस्त सुभाषराव जाधव,पुणे जिल्हा रा.काँ.चिटणीस सुनिल शिंदे,ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे,माजी सरपंच पोपटराव वहिले,पांडुरंग दाभाडे, राजेश बाफना,सुनील ढोरे,राजेंद्र कुडे, मंगेश खैरे,चंद्रजित वाघमारे, पंढरीनाथ ढोरे,राहुल पारगे,तुषार भेगडे,सोमनाथ धोंगडे,सुनिताताई कुडे,सुधाताई भालेकर,पुजाताई वहिले,आरतीताई राऊत,सर्व जेष्ठ नागरिक बाळासाहेब शिंदे,किसनराव वहिले,चंद्रकांत राऊत,शांताराम कुडे, सुधाकर वाघमारे, सुरेश कुडे, सुरेश गुरव,बाळकृष्ण ढोरे,बबनराव कदम,मारुतराव चव्हाण,नथुराम जाधव,अनिल ओव्हाळ,आफताब सय्यद,संजय शेडगे,गौतम सोनवणे, मयूर गुरव,प्रकाश कदम,भाऊसाहेब ढोरे,किरण ओव्हाळ,गणेश पाटोळे, गणेश पं ढोरे,शरद ढोरे,शैलेश वहिले, पंकज भामरे,विजय शिंदे,शंकर मोढवे,राहील तांबोळी,प्रणव ढोरे,केदार बवरे,पत्रकार बंधू, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान…”रक्तदान करूया,एक पुण्यकर्म करूया वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्ष्यात घेऊन रक्तदान करूया” या उक्तीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, राज्यमंत्री मदन बाफना,मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज,आई जोगेश्वरी यांस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

देशाचे नेते, खासदार शरदचंद्र पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरात 75 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.महिलांचा देखील रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद भेटला. प्रत्येक रक्तदात्यास 8 GB पेनड्राईव्ह भेट देण्यात आला. श्री. पोटोबा देवस्थान संस्थान व गरवारे रक्त संकलन केंद्र यांच्या सर्व डॉक्टर्स टिमने रक्तदान शिबिरास सहकार्य केले.

कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत,मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले यांनी केले.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.