Akurdi : पत्नीचा पतीच्या खूनाचा कट यशस्वी , पतीचा उपरचारा दरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – पती दुसरे ल्गन करणार सल्याने पत्नीने (Akurdi) त्याला जिवे मारण्याचा कट रचला, यातून तिने मारेकऱ्यांना सुपारी देत पतीवर तलवारीने वार केले. यावेळी गंभीर जखमी पतीवर दवाखान्यात उपचार सुरु होते. मात्र त्याचा आज (दि.16) मृत्यू झाला. ज्यामुळे कलमा मध्ये वाढ करून हत्येचा गुन्हा पत्नी व मारेकरांवर दाखल केला आहे.

शिवम दुबे ऊर्फ दुब्‍या आणि अमन पुजारी (दोघेही रा. पंचतारानगर, आकुर्डी) आणि जखमीची पत्‍नी या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जखमी व्यक्तीच्या मुलीने निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

Bhosari : ‘मनाचा अन् जगण्याचा निकट संबंध’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी (Akurdi )पत्नीला आठही मुलीच झाल्‍याने पती छळ करीत होता. तसेच त्‍याने दुसरे लग्‍न करण्‍याची तयारीही केली होती. यामुळे संतापलेल्‍या पत्‍नीने आपल्‍या पतीवर विषप्रयोगाचा प्रयत्‍न केला. मात्र तो सतत फसल्याने पतीचा खून करण्‍यासाठी तिने दोन लाखांची सुपारी दिली. सराईत गुन्‍हेगारांनी पतीवर खूनी हल्‍ला केल्‍यावर अवघ्‍या आठ तासांत निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

त्‍यानंतर तिने शेजारी राहणारा सराईत गुन्‍हेगार अमन पुजारी याला दोन लाख रुपयांची पतीच्‍या खूनाची सुपारी दिली. या कामासाठी त्‍याने आपला मित्र शिवम दुबे याला सोबत घेतले. सुपारी मिळालेल्‍या पैशातून त्‍यांनी तलवारीही खरेदी केल्‍या. 7 डिसेंबर रोजी रात्री पती दारू पिऊन झोपल्‍याचे पत्‍नीने आरोपींना सांगितले. त्‍यानंतर घरात घुसून आरोपींनी पतीवर तलवारीने सपासप वार केले. पती मृत झाल्‍याचे समजून आरोपी तेथून निघून गेले.

घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी तपासाला सुरवात केली. आसपासच्‍या परिसरातील सीसीटिव्‍ही फुटेजची पाहणी केली असता पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांनी आरोपी अमन याला ओळखले. त्‍याला ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता त्‍याने आपला साथीदार दुबे याचे नाव सांगितले. त्‍यानुसार पोलिसांनी त्‍यालाही अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता जखमी व्‍यक्‍तीच्‍या पत्‍नीनेच आपल्‍याला सुपारी दिल्‍याचे सांगितले. त्‍यानुसार पोलिसांनी पत्‍नीला अटक केली असता तिने गुन्‍ह्याची कबुली दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.