Chinchwad Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ; लाथाबुक्क्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. तसेच माहेरवरून पैसे आणण्याची मागणी केली. याबाबत विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सासरच्या सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती प्रवीण अशोक जाधव (वय 27), सासू नंदा अशोक जाधव (वय 55), सासरे अशोक जाधव (वय 65), दीर नंदकुमार अशोक जाधव (वय 35), जाऊ सुलोचना नंदकुमार जाधव (वय 27, सर्व रा. रामनगर, चिंचवड), नणंद प्रमिला राजू कुसाळकर (वय 36, रा. येरवडा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर 2018 ते 11 फेब्रुवारी 2021 या कालावधीत आरोपींनी पिडीत विवाहितेचा छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन लहान लहान कारणांवरून तिला घालून पाडून बोलले जात.

तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.