Pune Corona Update : दिवसभरात 4895 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ; 4688 रुग्णांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका हद्दीत आज 4895 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 4688 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले. आज 20,501 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.
कोरोनाबाधीत 91 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 28 रूग्ण पुण्याबाहेरील होते. कोरोना मृतांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे.
सध्या महापालिका हद्दीत 1392 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 44,203 इतकी आहे.
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4,15,399 इतकी झाली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 6732 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3 लाख 64 हजार 464 जणांना आजपर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.
तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.