Maval News : आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने देहु कोविड केअर सेंटरला फळे वाटप

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमाअंतर्गत देहू येथील कोविड केअर केअर सेंटर मधील कोरोना रुग्ण व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, कर्मचारी यांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी प्रा. विकास कंद, उपसरपंच अभिजीत काळोखे, सचिन कुंभार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिन काळोखे, विशाल झेंडे, मयुर झोडगे,आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंचचे सदस्य उपस्थित होते.

आमदार शेळके यांच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमाअंतर्गत मागील वर्षभरापासून विविध आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा, टाकवे, तळेगाव दाभाडे, इंदुरी येथील कोविड केअर सेंटर मध्ये फळ वाटप करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.