Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 125 नवे रुग्ण तर 138 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.21) 125 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज ग्रामीण भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज एकही रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला नसुन आतापर्यंत 415 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2260 आहे.

शहरी भागात 37 तर ग्रामीण भागात 88 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 22 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 13 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 2 रुग्ण सापडले.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 21,179 झाली आहे. तर दिवसभरात 138 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात वराळे 15, तळेगाव दाभाडे ग्रामीण 13, वाकसई 9, लोहगड 8, जवन 4, कामशेत 4, वरसोली 4, माळवाडी 3, नवलाख उंब्रे 3, गहूंजे 2, इंदोरी 2, केवरे 2, साळुंब्रे 2, ठाकुरसाई 2, तिकोणा 2, आंबी, ब्राम्हणवाडी साते, दारुंब्रे, घोणशेत, गोडुंब्रे, जांभवडे, मळवली, पांगळोली, पिंपळ खुटे, शिवणे, सोमाटणे, सुदवडी, उर्से प्रत्येकी 1 असे एकूण 88 रुग्ण सापडले.

18,505 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 6938, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 3708 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1096 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 11,742 रुग्ण तर ग्रामीण भागात 9437 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 87.37 टक्के आहे तर मृत्यू दर 1.96 टक्के आहे.

सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 859 लोणावळा नगरपरिषद मध्ये 176 वडगाव नगरपंचायत मध्ये 81 व ग्रामीण भागात 1144असे एकूण 2260 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.