WTC 2021 : पावसाचा व्यत्यय सुरुच, चौथ्या दिवसाचा खेळ रद्द
एमपीसी न्यूज – भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना इंग्लंड येथील साऊथम्पटन मैदानावर सुरू आहे. भारताचा पहिला डाव 217 धावांत आटोपल्यानंतर न्युझीलंडचा पहिला डाव सुरू झाला. मात्र, सततच्या पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे.
रविवारी तिसऱ्या दिवशी काईल जेमीसनच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, तर न्यूझीलंडच्या फलंदाजीपुढे गोलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या माऱ्यापुढे भारताचा पहिला डाव 217 धावांत संपुष्टात आला.
Day four of the #WTC21 Final has been abandoned due to persistent rain ⛈️#INDvNZ pic.twitter.com/QvKvzQCphG
— ICC (@ICC) June 21, 2021
त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात 2 बाद 101 अशी मजल मारत सामन्यावरील पकड घट्ट केली आहे. यामध्ये डेव्हॉन कॉन्वेच्या (153 चेंडूंत 12 चौकारांसह 54 धावा) अर्धशतकाचा यात समावेश आहे.