Bhosari News : कृष्णाबाई खळदकर व वामनराव खळदकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – भोसरी येथील कृष्णाबाई वामनराव खळदकर (81) व त्यांचे पती वामनराव बाळासाहेब खळदकर (92) यांचे निधन झाले आहे. अवघ्या तीन दिवसांच्या अंतराने पती – पत्नीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख व संचालक विजय खळदकर यांचे ते आई- वडील होत.

कृष्णाबाई खळदकर यांचे सोमवारी (दि.16) निधन झाले तर, वडील वामनराव खळदकर यांचे गुरुवारी (दि.19) निधन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.