Pune Crime News : भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत पादचारी व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या एका दुचाकीने जोराची धडक दिल्याने पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. विमानतळ रस्त्यावर रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. बसुराज भीमाशंकर आरेनोर (वय ६१, रा. लोहगांव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलगा अमेश आोरनोर (वय २४) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बसुराज हे इंदिरानगर परिसरात राहतात. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते विमानतळ रस्त्याने पायी जात होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीचालक आणि त्यांना जोराची धडक दिली.  यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकी चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एम. एस. पाठक करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.