Maharashtra Corona Update : मोठा दिलासा! राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 50 हजारांच्या खाली

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील नव्यानं वाढ होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या निरंतर कमी होत आहे. तर, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 50 हजारांच्या खाली आली असून, मोठा दिलासा मिळाला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज (सोमवारी) 3 हजार 643 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 6 हजार 795 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64 लाख 28 हजार 294 एवढी झाली आहे. त्यापैकी 62 लाख 38 हजार 794 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात सध्या 49 हजार 924 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 105 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यात आजवर 1 लाख 36 हजार 067 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट वाढून 97.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 24 लाख 45 हजार 689 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 02 हजार 888 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 487 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.