Maharashtra Corona Update : राज्यात आज 1,193 नवे कोरोना रुग्ण, 1,519 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (बुधवारी) दिवसभरात 1 हजार 193 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 1 हजार 519 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या घटली असून, सध्या राज्यात 15 हजार 119 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 14 हजार 158 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 55 हजार 100 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.60 टक्के झाला आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 1,193
*⃣Recoveries – 1,519
*⃣Deaths – 39
*⃣Active Cases – 15,119
*⃣Total Cases till date – 66,14,158
*⃣Total Recoveries till date – 64,55,100
*⃣Total Deaths till date – 1,40,313
*⃣Tests till date – 6,29,47,355(1/4)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) November 3, 2021
राज्यात आज 39 रुग्ण दगावले असून, आजवर 1 लाख 40 हजार 313 जण कोरोनामुळे दगावले आहेत. सध्या राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 29 लाख 47 हजार 355 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 895 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 87 हजार 286 जण होम क्वारंटाईन आहेत.