Indian Team Head Coach : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड

एमपीसी न्यूज – भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्याकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. T20 वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर टीम इंडियाला राहुल द्रविडचं मार्गदर्शन लाभणार आहे.

भारत न्यूझीलंड मालिकेदरम्यान राहुल द्रविड आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. राहुल द्रविड 2023 पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. दुसरीकडे पारस म्हाम्ब्रे यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे. द्रविड 19 वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.