Chinchwad News: रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
एमपीसी न्यूज – सेवा सारथी व ह्युमॅनिटी सेंट्रलतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 70 जणांनी शिबिरात सहभाग घेतला.
पूर्णानगर, शनिमंदिर येथे नुकतेच हे शिबिर पार पडले. कोरोना काळामध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागला होता. जास्तीत-जास्त नागरिकांना रक्ताची कमतरता भासू लागली होती. भविष्यात समाजातील विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य गरजू जनतेपर्यंत रक्तपुरवठा केला जावा; यासाठी ओंकार मांडगे यांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.रक्तदान शिबीर सर्व शासन नियमांचे पालन करून पार पडले.
तसेच रक्तदान केल्याबद्दल आयोजकांतर्फे सर्व नागरिकांचे आभार मानण्यात आले. आर्यन महाजन, श्रीधर कुंभार, योगेश पाठक, साहिल घुले, ईशान मोटे, सिद्धांत बोऱ्हाडे, शशिकांत कोटे, नितीन कोरडे, ऐश्वर्या भिसे, तुषार जगताप तसेच ह्युमानिटी सेंट्रलचे अपूर्वा काळे, अभिषेक शिंदे, समृद्धी पाटील, सायली वाखारे, तेजस पवार यांनी शिबिरासाठी पुढाकार घेतला.