Pimple Gurav News : टोळक्याकडून इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न
एमपीसी न्यूज – चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयता व दांडक्याने मारहाण करत इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवी सांगवी व रामनगर, पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.20) रात्री 8 ते 8.30 ही घटना घडली.
अक्षय शत्रुघ्न सांगळे (वय 29, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मोन्या धिवार, आशित धिवार आणि तीन अनोळखी इसमांविरोधात खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय यांचा भाऊ प्रज्वल जाधव हा मित्रांसोबत रविवारी रात्री आठ वाजता गणेश मंगल केंद्र, नवी सांगवी जवळून दुचाकीवरून जात होते. त्यावेळी आरोपींनी प्रज्वल जाधव यांना मारहाण केली. तसेच, फिर्यादी व त्यांचा भाऊ यांना रामनगर येथे या टोळक्याने कोयता व दांडकाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. असे फिर्यादीत म्हटले आहे.