Sachin Ahir : उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याने लोक संतप्त, बंडखोरांचा राजकीय जीवनातील संन्यास सुरु

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे बंडखोर मंत्री, आमदारांचे (Sachin Ahir) बोलविते धनी हळूहळू जनतेच्या नजरेसमोर येत आहेत. विधानसभेतील फ्लोअर टेस्टच्या अगोदर बंडखोरांना रोड टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठित खंजीर का उपसला? याचा जाब मतदार, शिवसैनिक विचारणार आहेत. उद्धवसाहेबांना धोका दिल्याने बंडखोरांबाबत शिवसैनिकांसह ज्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही, अशा सर्वसामान्य लोकांमध्ये संताप, चीड निर्माण झाली आहे. बंडखोरांनी शिवसेनेच्या आमदारकीचे राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे. त्यांचे  डिपॉझीट जप्त केल्याशिवाय राहणार नाही अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. बंडखोरांचा राजकीय जीवनातील संन्यास सुरु झाला असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या पुढाकाराने शहरातील पदाधिका-यांची बैठक आज (सोमवारी) आकुर्डी येथे पार पडली. अहिर यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानिमित्त युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. युवा सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक राजेश पळसकर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, महिला संघटिका उर्मिला काळभोर, युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, कामगार नेते इरफान सय्यद, महापालिकेतील माजी गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रमोद कुटे, माजी नगरसेविका रेखा दर्शिले, मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शादान चौधरी, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, चिंचवडचे अनंत को-हाळे, भोसरीचे धनंजय आल्हाट (Sachin Ahir) आदी उपस्थित होते.

Sachin Ahir

सचिन अहिर म्हणाले, ”शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच आषाढीवारीची विठ्ठलाची पुजा व्हावी अशी वारक-यांची भावना आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या काळात कुटुंबप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी काम केले. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढले. त्यांच्या मागे आमचे लाख-लाख आर्शिवाद आहेत. संकटे येतील, जातील पण उद्धवसाहेबांचे कार्य हृदयात आहे. ते कोणी काढून नेवू शकत नाही, ही वारक-यांची भूमिका आहे. उद्धवसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची गरज नव्हती, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. बंडखोरांचे डिपॉझीट जप्त केल्याशिवाय राहणार नाही अशी लोकांची प्रतिक्रिया आहे”.

Sachin Ahir : शिवसेनेच्या बंडखोरांनी स्वगृही परतण्याची दारे स्वत:च बंद केली

”विधानसभेत फ्लोअर टेस्ट निश्चितपणाने होणार आहे. पण, फ्लोअर टेस्टच्या अगोदर बंडखोरांना रोड टेस्ट देखील द्यावी लागणार आहे. मतदारसंघात जातील. त्यावेळी लोकांना कशामुळे ही भूमिका घेतली. कोणते संकट तुमच्यावर कोसळले होते. हा निर्णय तुम्हाला का घ्यावा लागला, याबाबत काय सांगतील. उद्धवसाहेबांच्या पाठिशी खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही केले. कुटुंबप्रमुख नात्याने राज्याला नव्हे तर पक्षातील सर्वांना साथ दिली. पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्यामुळे बंडखोर मंत्री झाले आहेत. सत्ता येईल, जाईल. पण, पापाचे धनी हे 50 आमदार होत असतील. तर, त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही. बंडखोरांचा राजकीय (Sachin Ahir) जीवनातील संन्यास सुरु झाला आहे”, असेही ते म्हणाले.

निमित्त दाखवून  नेतृत्वाला बदनाम कराल तर शिवसैनिक सोडणार नाहीत

”अडीच वर्षात विरोधी पक्षाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप करता आला नाही. बंड केलेले आमदार तीन-चार महिन्यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्याकडून करोडो रुपयांचा निधी घेऊन जात होते. त्यावेळी त्यांना हिंदुत्व आठवले नाही. आज सांगताहेत महाविकास आघाडीसोबत राहिले नाही पाहिजे. मग, अडीच वर्षे सत्ता का भोगली. अडीच वर्षापूर्वीच का सांगितले नाही. त्यावेळी त्यांचे मत पटले असते. आज विकास निधी मिळाला नाही. आमच्याबाबतीत राजकारण करण्याचे काम केले जात आहे असे सांगत आहेत. निमित्त दाखवून तुम्ही नेतृत्वाला बदनाम करण्याचे पाप करणार असाल. तर, याद राख शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाहीत. सत्ता पाहिजे, कोणाला मंत्रीपद पाहिजे, वेगवेगळी आश्वासने दिली आहेत,” असेही अहिर म्हणाले.

बंडखोरांच्या मनामध्ये पाप, खोट

”शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने नोटीस दिली आहे. राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, हे महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. शिवसैनिकांवर आता मोठी जबाबदारी आहे. पेटून उठणा-या मतदारांपर्यंत सर्वांनी पोहचावे. आगामी निवडणुकीत जास्तीत-जास्त नगरसेवक, आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्धवसाहेबांना झालेल्या त्रासाबद्दल लोकांमध्ये चीड आहे. त्यामुळे तुम्हाला लोकांकडे जायची गरज नाही. लोकच शिवसेनेकडे येतील. एवढा आक्रोश लोकांच्या मनामध्ये झाला आहे. सत्ता अशाप्रकारे खेचून घेण्याचे पाप करत आहेत. कालपर्यंत मान गेली तरी चालेल म्हणणारे दुसर्या दिवशी गुवाहटीत गेले आहेत. तुम्ही पक्षासोबत आहेत म्हणत आहेत. आमच्या जिवावर निवडून आला आहेत. मग, तुम्हाला अशा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सांगा असा जाब विचारावा लागेल. विधानपरिषद निवडणुकीवेळी आमदार तीन दिवस एकत्र होते. त्यावेळी बंडखोर लोक काहीच बोलले नाहीत. त्यांना भूमिकाच मांडायची होती. तर, हक्काचे व्यासपीठ सोडून गेले. त्यामुळे त्यांच्या मनात काही तरी पाप, खोट आहे. हे सुस्पष्ट दिसत आहे. आज आमचा उद्धवजींवर रोष नाही. महाविकास आघाडीवर रोष आहे असे सांगतात. मग, उद्धवजींना का सांगितले नाही. विधानपरिषदेत बंडखोरी केली. आता बंडखोरांच्या हातात काही राहिले नाही. गाडी चालविणारा दुसराच आहे. तो गाडी दुस-या दिशेने घेऊन जात आहे. त्यामुळे त्यांच्यात चलबिचल होत आहे. कारवाईची वेळ आली. न्यायालयात का जाण्याची वेळ आली, याची बंडखोर आमदारांना भिती सतावत आहे”, असेही अहिर (Sachin Ahir) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.