Talegaon Dabhade : ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत इनरव्हील क्लबतर्फे ध्वज वाटप
एमपीसी न्युज – ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमा अंतर्गत इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांनी सर्व सदस्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप केले. येणाऱ्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला क्लबचे सर्व सदस्य घरावर तिरंगा फडकवून या उपक्रमात सामील होणार आहेत. या उपक्रमात जास्तीत जास्त जणांनी सामील व्हावे असे आवाहन अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केले.
या वेळी सर्व माजी अध्यक्षा, सचिव निशा पवार,पीपी काजल गारोळे,उपाध्यक्षा संध्या थोरात,खजिनदार अनुप्रिया खाडे, आय अस ओ अर्चना देशमुख,क्लब करस्पॉंडट जयश्री दाभाडे व सर्व सदस्या उपस्थित होत्या.