Crime News : वाकड खून प्रकरणातील आठही आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – वाकड येथे किरकोळ कारणावरून मद्यधुंदअवस्थेतील आठ जणांनी गुरुवारी (दि.28) संध्याकाळी सहा वाजता तरुणाचा चाकू खूपसून खून केला होता. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आठ आरोपी व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

दिपक भगवान गायकवाड उर्फ सुमित सावंत (वय 22), अमोल देशमुख (वय 23),  अभिषेक उर्फ नंदु कांबळे (वय 19), आशिष भिसे उर्फ मर्फी (वय 20),सुजित लोंढे (वय.18),ब्रम्हा जाधव (वय 20),महेश जाधव (वय23),सौरभ जाधव (वय18) व एक अल्पवयीन अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आदित्य अशोक थोरात (वय 19 रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपी हे  वाकड येथील एका गॅरेजमध्ये दारु पित बसले होते. यावेळी तेव्हा तेथे असणाऱ्या अल्पवयीन मुलाला सुजित याने सिगारेट आणण्यास सांगितले. यावेळी मयत खंडूने तो लहान आहे त्याला का पाठवतो म्हणत सुजितच्या कानाखाली मारली.यावरून चिडून जाऊन तुझी विकेटच पाडतो म्हणत आरोपींनी खंडूला मारहाण करत त्याच्या पोटात चाकू खूपसून त्याचा खून केला. तर खंडूचा मित्र लखन अडविण्यास गेला असता लखनलाही जखमी करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.वाकड पोलिसांनी सर्व आरोपींना अटत केली असून पुढिल तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.