Bhagat Singh Koshyari : शिंदे सरकार करणार राज्यपालांची केंद्राकडे तक्रार

एमपीसी न्यूज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी (Bhagat Singh Koshyari) लोकांनी पैसा काढून घेतला तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हंटले जाणारा नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांच्यावर टिकेचा भडीमार सुरु झाला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटालाच लक्ष केले आहे.त्यानंतर आता शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रीया आली आहे.मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी कोश्यारी यांचं हे वक्तव्य राज्याचा अपमान करणारं असल्याचं म्हटले आहे. तसेच या विरोधात मुख्यमंत्री शिंदे केंद्र सरकारकडे तक्रार करतील, अशी माहिती दिली.

केसरकर म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांनी जे वक्तव्य केलं ते राज्याचा अपमान करणार आहे. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी विधानं पुन्हा होऊ नये म्हणून केंद्राला पत्र पाठवितील. केंद्र सरकार राज्यपालांना अशी विधान न करण्याबाबत सांगतील.

 

 

 

मुंबई केवळ दोन समाजाची नाही

मुंबई हे बहुसांस्कृतिक लोकांचं शहर आहे. ते केवळ दोन समाजाच नाही. मुंबईच्या विकासात अनेक समाजांचं योगदान आहे. मुंबईच्या उभारणीत सर्वाधिक वाटा मराठी माणसाचा आहे ही देखील वस्तुस्थिती आहे.म्हणून दोनच समाज का मुंबईतील औद्योगिक विकासासाठी पारसी समाजाने मोठे योगदान दिले आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाच्या योगदानावर बोलायच असतं. परंतु पैसा काढून घेतला तर मुंबईत काही शिल्लक राहणार नाही म्हणजे त्यांनी मुंबईचा अभ्यास केला नाही, असे केसरकर म्हणाले.

 

मुंबई आर्थिक राजधानी का आहे कारण बहुतांशी बॅंकांची मुख्यालयं मुंबईत आहेत. अगदी रिझर्व्ह बॅंकेचं मुख्यालय मुंबईत आहे. आर्थिक राजधानी कशाला म्हणतात तर पुर्वी भारताच्या एकूण करापैकी 40 टक्के हिस्सा मुंबईतून येत होता. हे योगदान केवळ एका समाजाच नाह, तर सर्व समाज एकत्र आले. यात पंजाबमधील उद्योगपती, मारवाडी यांचा समावेश आहे. केवळ काठी आणि लोटा घेऊन लोक आली व त्यांना या शहरान आसरा दिला, मोठ केलं. कुणीही बाहेरुन गुंतवणूक घेऊन मुंबईत आल नाही, असेही केसरकरांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.