Scout Guide Squad : श्री म्हाळसाकांत विद्यालयात स्काऊट गाईड पथक नोंदणी शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारत स्काऊट व गाईड जिल्हा संस्था व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालय आकुर्डी येथे दिनांक 29 जुलै रोजी स्काऊट गाईड पथक नोंदणी व एक दिवसीय सामान्य माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमासाठी उषा हिवराळे जिल्हा संघटक, सौ.शिकलगार जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, दिलिप नेवसे जिल्हा प्रशिक्षण, दिगंबर करंडे जिल्हा संघटक, सु.ग.सोनवणे बारामती स्थानिक संस्था चिटणीस, संतोष कोळी कनिष्ठ लिपिक उपस्थित होते.

 

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाखांमधील एकूण स्काऊट 126 पथक व गाईड 94 पथकांची नोंद झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री एस आर रोकडे पर्यवेक्षक एस एस मोरे श्री आवारी अशोक श्री एस पाटील श्री एन एम पाटील सौ.बामणे उषा सौ.माने एस डी तसेच श्री उदावंत बाळकृष्ण श्री झेंडे रवि यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमात शाळेच्या वतीने जयपुर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील योगासन लिग स्पर्धेत सुवर्णपदक व कांस्य पदक मिळवणारी कु.निशा जमादार हिचा पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. दिगंबर करंडे व उषा हिवराळे यांनी स्काऊट गाईड चे महत्व व योगदान याबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुनिल लाडके यांनी केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाखांमध्ये स्काऊट गाईड पथक राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे.शाखा पातळीवर मुलांमध्ये नेतृत्व संघटन स्वावलंबन आदर खिलाडूवृत्ती सहकार्य या मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी विविध कॅंप व शिबिरांचे आयोजन केले जाते.राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा व बालेवाडी जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत संस्थेच्या सर्व शाखांमधील स्काऊट गाईड पथकांचे दिमाखदार संचलन केले जाते.अशी माहीती मुख्याध्यापक सुनिल लाडके यांनी दिली.

संस्थेचे अध्यक्ष मा अजितदादा पवार साहेब व संस्था पदाधिकारी उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव संदिप कदम खजिनदार मोहनराव देशमुख उपसचिव एल एम पवार सहसचिव ए एम जाधव यांनी प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे स्काऊट गाईड मध्ये अनेक शाखांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहे.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.जगताप एच पी व सौ.बामणे यांनी केले तर संस्थेच्या सर्व शाखांमधील उपस्थित शिक्षकांचे पर्यवेक्षक एस ए मोरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.