Pune Crime News : गाडी चोरून पळून जाताना अपघातात पादचाऱ्याला मृत्यूमुखी पाडणारा अल्पवयीन ताब्यात  

एमपीसी न्यूज –  अल्पवयीन मुलाने व त्याच्या साथीदाराने गाडी चोरी करून पळून जात असताना त्याचा अपघात झाला. या अपघातात पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक (Pune Crime News) देत त्या व्यक्तीला मृत्युमुखी पाडले. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही करावाई पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा दोन यांनी गुरुवारी (दि.28) केली.

रोहित रामप्रताप वर्मा (वय 22 रा. वानवडी) व त्याचा 16 वर्षाचा अल्पवयीन साथीदार यांना वाहनचोरी व अपघात या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हे गस्त घालत असतांना त्यांना बातमी मिळाली की दुचाकी चोरी करणारे सराईत वानवडी येथे आहेत. त्यानुसार पोलिसांनी रोहीत व अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.आरोपींनी लिफ्टचा बहाणा करत स्कूटी घेऊन जाणाऱ्या नागरिकाला दमदाटी करत त्याची स्कूटी घेऊन पळून जात होते. पोलिसांनी गाडीसह दोघांना ताब्यात घेत तपास करण्यास सुरुवात केली. या तपासात आरोपींनी आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. खराडी बायपास येथे गाडीची चोरी करण्याचे ठरवेल.यावेळी उभी असलेल्या सुमो गाडीत चालक (Pune Crime News) झोपला असताना त्याला उठवून दमदाटी करत त्यांनी गाडी चोरली. यावेळी ती गाडी अल्पवयीन मुलाने चालविण्यास घेतली तर रोहीत हा शेजारी बसला होता. हि गाडी घेऊन वानवडीकडे जोत असताना खिंडीत हेवनपार्क जवळ गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी एका पादचाऱ्याला धडकली व शोजारील खड्ड्यात पडली.या अपघातात पायी जाणारा नागरिक मृत्यूमुखी पडला. रोहीत व त्याचा साथीदार हे गाडी सोडून तेथून पळून गेले होते. यावरून पोलिसांनी दोघांवर अघात व वाहनचोरीचा विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

पोलीस तपासात आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याजवळून पोलिसांनी 1 लाख 25 हजार रुपयांची चार दुचाकी वहाने जप्त केली आहेत. तसेच त्यांच्यावरील कोंढवा, वानवडी, हडपसर, चंदन नगर,हिंजवडी, यवत या पोलीस ठाण्यात दाखल असलेले सात गुन्हेही यावेळी उघड झाले आहेत. याचा पुढिल तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.