Chikhali : घटस्फोटाची मागणी करत दुसरा विवाह करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – घटस्फोटाची मागणी करत पत्नीचा छळ कऱणाऱ्या व एक लग्न झालेले असतानाही दुसऱे लग्न कऱणाऱ्या पतीवर चिखली (Chikhali) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबर 2013 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत मुलीच्या सासरी म्हणजे अहमदनगर येथे घडला.

याप्रकरणी पिडीतेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती दादासाहेब उर्फ सुरज नामदेव शिंदे (रा. शिरूर), सासरे नामदेव चांगदेव शिंदे, सासु दिर सागर नामदेव शिंदे व नणंद (सर्व राहणार अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Women Molesting : महिलेचा पाठलाग करत विनयभंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आरोपीसोबत (Chikhali) लग्न झाल्यापासून म्हणजे 2013 पासून तू घटस्फोट दे अशी मागणी केली जात होती. त्याला नकार दिला असता पिडीतेचा शारीरिक व मानसीक छळ करण्यात आला. तसेच फिर्यादी यांनी कमावलेले तीन लाख रुपये व स्त्री धनाचे दिड लाखांचे दागिने पती स्वतः कडे घेतले.

त्याची विचारणा केली असता नणंदेने फोनववरून शिवीगाळ केली. दरम्यान आरोपी पतीने फिर्यादी या हयात असताना दुसरे लग्न करत त्यांची फसवणूक केली आहे. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.