Women Molesting : महिलेचा पाठलाग करत विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेचा पाठलाग (Women Molesting) रत तिचा 27 वर्षीय तरुणाने विनयभंग केला आहे. ही घटना भोसरी येथे शुक्रवारी (दि.12) रोजी घडली.

याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विशाल नागटिळक (वय 27, पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा तोंड ओळखीचा आहे. त्याने व फिर्यादीने व्हॉटसअपवर केलेल्या चॅटींगचे व व्हिडीओ कॉलचे स्क्रीन शॉन व्हायरल करण्याची धमकी देत त्याने प्रेम संबंध ठेवण्याची मागणी केली. याला फिर्यादी यांनी नकार दिला असता आऱोपीने शुक्रवारी त्यांचा पाठलाग करत विनयभंग केला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात (Women Molesting) तरुणाविरोधात विनयभंग व धमकावण्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

Vinayak Mete Death : चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विनायक मेटे यांचा अपघात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.