Pune News : ‘आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी’वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी व इन्डायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि आयसीएआय पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जीएसटी’वरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आखाडे यांच्या हस्ते झाले.

यावेळी ‘आयसीएआय’च्या जीएसटी कमिटीचे चेअरमन सीए राजेंद्र कुमार, व्हाईस चेअरमन सीए उमेश शर्मा, विभागीय समितीच्या सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अगरवाल, सचिव सीए प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे, ‘विकासा’च्या चेअरपर्सन सीए मौसमी शहा, परिषदेचे समन्वयक सीए अजिंक्य रणदिवे, सदस्य सीए अमृता कुलकर्णी, सीए सचिन मिनियार, सीए ऋषिकेश बडवे आदी उपस्थित होते.

Pune News : प्रेयसीला ब्लॅकमेल करत उकळले 75 हजार, प्रियकरावर गुन्हा दाखल

‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात ही दोन दिवसांची परिषद होत आहे. ‘उद्धारणम – शेअरिंग नॉलेज’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. 550 पेक्षा अधिक सनदी लेखापाल या परिषदेत सहभागी झाले होते.

सीए राजेंद्र कुमार, सीए उमेश शर्मा यांनीही मनोगते व्यक्त केली. सीए काशिनाथ पाठारे यांनी स्वागत-प्रास्ताविकात परिषदेचे महत्व विषद केले. सीए सायली चंदालिया यांनी सूत्रसंचालन केले. सीए प्रितेश मुनोत यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.