PCMC RTO : “तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला”, रिक्षा चालकांचे आरटीओला साष्टांग दंडवत

एमपीसी न्यूज : वारंवार सांगूनही बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात कोणतीही कारवाई न करणाऱ्या आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांच्या विरोधात पुण्यातील रिक्षा चालक चांगलेच आक्रमक झाले होते. रिक्षा चालकांच्या काही प्रतिनिधींनी सोमवारी आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांना साष्टांग दंडवत घातला. इतकेच नाही तर तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला असे म्हणत निषेध केला.

Nigdi News: सातव्या भक्ती-शक्ती सायक्लोथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आक्रमक झालेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालकांनी सोमवारी आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले. इतकेच नाही तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात बेमुदत बंदची हाकही दिली होती. सोमवारी मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर एकत्र येत आंदोलन केले. पोलीस अधिकाऱ्यांनी आरटीओ आणि रिक्षा संघटनांमध्ये मध्यस्थी करत चर्चा केली. आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांच्याकडून पुन्हा तीच तीच आश्वासन दिली जात असल्याचे पाहून रिक्षा चालकांनी शिंदे यांना ‘फेकू अधिकारी’ म्हणत साष्टांग दंडवत घातला.

तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला, तुमच्यासह प्रशासनाचा धिक्कार असो. तुमच्या या फेकुगिरीला आणि बोलबच्चन गिरीला आम्ही कंटाळलो आहोत. प्रत्येक वेळी तुम्ही कारवाई करण्याचे आश्वासन देता मात्र दिलेला शब्द पाळत नाहीत असे म्हणत या रिक्षा चालकांनी आणि रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी आरटीओ अजित शिंदे यांना कार्यालयातच साष्टांग दंडवत घातला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.