Plastic Ban : प्लॅस्टिक बंदी शिथिल; ‘या’ वस्तूंना परवानगी!

एमपीसी न्यूज : विघटन होणाऱ्या आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक निर्बंध (Plastic Ban) राज्यात शिथिल करण्यात आले आहेत. उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्लॅस्टिक उद्योजकांसोबतच अन्नपदार्थ आणि मिठाई व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासोबतच राज्य सरकारने (Plastic Ban) मिठाई बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पाकिटांचे आवरणाच्या प्लॅस्टिकवर देखील बंदी घातली होती. त्यांनाही आता दिलासा देण्यात आला आहे. प्लॅस्टिक बंदीमुळे लहान मोठ्या अशा सहा लाखांहून लोकांच्या कुटुंबाचा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे उद्योजकांनी पुढाकार घेऊन ही बंदी उठविण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि लघु उद्योजकांच्या संघटनांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिक बंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अधिसूचनेमध्ये 50 ग्रॅम प्रतिचौरस मीटरपेक्षा (जीएसएम) कमी जाडीच्या पिशव्या, ताटे, वाटय़ा, ग्लास, काटे, चमचे या वापराला परवानगी दिली आहे. मात्र, या वस्तू विघटन होणार असल्याचे ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अण्ड टेक्नॉलॉजी’ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे.

PCMC News : वैद्यकीय विम्याची 10 कोटींची तरतुद ‘धन्वंतरी’कडे वळवली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.