Sidhu Moose Wala Murder : गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार अटकेत

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala Murder) याच्या हत्येचा मुख्य सूत्रधार गोल्डी ब्रार याला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर संस्थांना याबाबतची माहिती मिळाली आहे. पंजाब पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला गोल्डी ब्रार कॅनडाहून अमेरिकेला जात असताना पकडला गेला.

सिद्धू मुसेवाला याची 30 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येची जबाबदारी गोल्डी ब्रार याने घेतली होती. या अटकेबाबत कॅलिफोर्निय सरकारने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गोल्डी स्टडी व्हिसावर कॅनडात शिकण्यासाठी गेला होता पण गुरलालच्या हत्येनंतर तो पुन्हा गुन्हेगारीच्या जगात सक्रिय झाला.

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याच्यासोबत मिळून या हत्येचा कट रचण्यात (Sidhu Moose Wala Murder) आला होता. कॅनडात राहून भारतातील तुरुंगात बंद कैद्यासोबत संगनमत करून त्याने हे हायप्रोफाईल हत्याकांड घडवून आणले होते. 29 मे 2022 रोजी सायंकाळी जवाहरके गावात 30 गोळ्या घालून हि हत्या करण्यात आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.