Alandi : आळंदीमध्ये श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बाईक रॅली
एमपीसी न्यूज : आळंदी येथील गोपाळकृष्ण (Alandi) मंदिर सरदार बिडकर वाडा येथे श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळ्या निमित्त असणाऱ्या कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी पोपटराव बेदरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला.
तद्नंतर श्री संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन हे सरदार बिडकर, शरद पळसे, राजेंद्र शहाणे, अॅड.अनंत बेदरे, चंद्रकांत टाक, प्रकाश शहाणे, विनायक बेलापूरकर व समस्त सराफ संघटनेने केले.
Pimpri News: आर्थिक साक्षरता समृद्ध समाजासाठी आवश्यक – प्रा. सुनिल सालके
श्री संत नरहरी पुण्यतिथी सोहळ्या निमित्त शहरात बाईक रॅली आयोजन करण्यात आले होते. तसेच बिडकर वाडा येथे ह भ प पंडित महामुनी यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती.
कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबतची माहिती विनायक महामुनी यांनी दिली.