Maval HSC Result : बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयाची घवघवीत यशाची परंपरा याही वर्षी कायम

इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी तालुक्यात पहिली; मुलींनी मारली बाजी

एमपीसी न्यूज – बारावीच्या परीक्षेत (HSC Result 2023) दरवर्षीप्रमाणे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. इंद्रायणी महाविद्यालयाची क्रीशा उके या विद्यार्थिनीने विज्ञान विभागात 92.33 टक्के गुण मिळवत तालुक्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.महाविद्यालयाच्या निकालात सलग सहाव्या वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. सर्व शाखांमध्ये मुलींनी पहिला क्रमांक मिळवला आहे.

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Result 2023) गुरूवारी (दि. 25) जाहीर झाला आहे. इंद्रायणी महाविद्यालयाचा बारावी विज्ञान विभागाचा निकाल 91.36 टक्के, वाणिज्य 88.70 कला शाखेचा निकाल 75.94 टक्के, तंत्रशिक्षण विभागाचा निकाल 97.33 टक्के लागला आहे.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे,कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, विश्वस्त विलास काळोखे,संजय साने, परेश पारेख,संदीप काकडे,युवराज काकडे तसेच प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य अशोक जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे –

विज्ञान शाखा

1) कु उके क्रिशा कृष्णा 92.33%

2) धायगुडे रोहित अंनतराव 88.00%

3) कु.जगताप सृष्टी सुभाष  86.17%

वाणिज्य शाखा

1) कु. काशिद श्रृती प्रदीप 89.33%

2) रणपिसे सार्थक रोहिदास 84.00%

3) सुर्वे सुरज तानाजी 83.17%

कला शाखा

1) कु.साळुंके महादेवी शाम 77.83%

2) कु.चव्हाण तेजल चरणसिंग 71.00 %

3) वाकडे अनिकेत रवींद्र 70.17%

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.