Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ॲथेलेटीक स्पर्धेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज – मावळ तालुका स्तरीय ॲथेलेटीक स्पर्धेत (Talegaon Dabhade)कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.उंच उडी,रिले,तिहेरी उडी,लांब उडी,चालणे,धावणे,थाळी फेक,भाला फेक अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवले आहे. या स्पर्धा 9 व 10 ऑक्टोबर रोजी इंद्रायणी महाविद्यालय येथे पार पडला.

दि 9 व 10 ऑक्टोबर 2023 रोजी मावळ तालुका स्तरीय ॲथेलेटीक (Talegaon Dabhade) स्पर्धेत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.मुलांच्या 17 वर्ष वयोगटातील उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवम राय याने, तर तिसरा क्रमांक अभिषेक शेवकर याने मिळविला. (4×400) रीले स्पर्धेत शिवम राय, अभिषेक शेवकर,विशाल इप्पर,पार्थ भेगडे व जीत थोरात या संघाने तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच ट्रिपल जंप मध्ये दुसरे स्थान सिद्धार्थ काकडे, तर तिसरे स्थान युगांत देशमूख याने मिळविले.

Tathwade : जमिनीच्या वाटणीवरून सख्या भावांमध्ये वाद

14 वर्ष वयोगटातील उंच उडीमध्ये दीपक यादव याने (Talegaon Dabhade)दुसरा क्रमांक मिळविला. लांब उडीमध्ये हितेश शिरसाट याने दुसरा क्रमांक मिळविला, तर आयुष दिघे याने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. 5 किमी चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक गौरव चोरडिया, तर तिसरा क्रमांक चैतन्य येवले याने मिळविला.

मुलींसाठी असलेल्या 17वर्ष वयोगटातील उंच उडी स्पर्धेत दुसरा क्रमांक पायल लोहार हिने, तर तिसरा क्रमांक श्रेया झावरे हिने मिळविला. थाळी फेक स्पर्धेत समिक्षा राऊत हिने तिसरे स्थान, तर भाला फेकमध्ये दुसरे स्थान मिळविले. रीले स्पर्धेत मुलींनी तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत स्वराली मराठे दुसरा क्रमांक, तर 400 मीटरमध्ये पायल लोहारने तिसरा क्रमांक मिळविला.

14 वर्ष वयोगटातील लांब उडीमध्ये ईश्वरी बसारगे हिने प्रथम क्रमांक मिळविला. 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत तनिष्का देशमूखने तिसरा क्रमांक मिळविला. या स्पर्धा इंद्रायणी महाविद्यालय येथे पार पडल्या. क्रीडा शिक्षक सुवर्णा झणझणे व सचिन आंद्रे यांनी विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेसाठी सातत्याने तयारी करून घेतली. संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, खजिनदार गौरी काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर व शाळेच्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.