Vadgaon Maval : मावळकरांसाठी वैचारिक मेजवानी असलेल्या सरस्वती व्याख्यानमालेत प्रतिथयश मान्यवरांना ऐकण्याची संधी

व्याख्यानमाला, सन्मान सोहळा, आरोग्य शिबीर अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – श्री.पोटोबा देवस्थान संस्थानच्या (Vadgaon Maval) सहकार्याने मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला रविवार (दि.15) ते सोमवार (दि. 23) या कालावधीत होणार आहे. व्याख्यानमालेचे यंदा 23 वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मावळ परिसरातील नागरिकांना प्रतिथयश आणि उत्तम वैचारिक बैठक असलेल्या वक्त्यांना ऐकण्याची संधी मिळाली आहे. याबाबतची माहिती मावळ विचार मंचचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीराम ढोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नऊ दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत विविध विषयांवर उहापोह होणार आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा होणार आहे. 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी आरोग्य तपासणी शिबीर देखील होणार आहे.

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा शुभारंभ

व्याख्यान वार / दिनांक / प्रमुख वक्ते आणि व्याख्यानाचा विषय / अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे याप्रमाणे –

रविवार दि. 15 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते ज्ञानदास डॉ. विजयकुमार फड ( IAS )
विषय – गीता ज्ञानेश्वरी जीवनदृष्टी
अध्यक्ष- भाजपा राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पुणे मेधाताई कुलकर्णी, हभप.युवा कीर्तनकार जयश्रीताई येवले (झी टॉकीज फेम)

सोमवार दि. 16 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते- उदय निरगुडकर (मा.संपादक Zee 24 तास )
विषय- सन 2047 चा भारत
अध्यक्ष – सुरेश साखवळकर ( संपादक -अंबर )
प्रमुख पाहुणे- किरण काळे ( ACP मुंबई )

मंगळवार दि.17 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते – अजय पूरकर (सिने अभिनेते, फेम – पावनखिंड )
विषय – पावनखिंड
अध्यक्ष -सत्यसाई कार्तिक ( IPS )
प्रमुख पाहुणे- राजेंद्र पवार ( मुख्य अभियंता , महावितरण , पुणे )

बुधवार दि.18 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते – मृणालताई देव – कुलकर्णी (सिने अभिनेत्री )
विषय- माझा अभिनय प्रवास
अध्यक्ष – अश्विनीताई जगताप (आमदार,चिंचवड विधानसभा )
प्रमुख पाहुणे- भाऊसाहेब गुंड ( अध्यक्ष, मावळ भाजपा )

गुरूवार दि.19 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते- प्रा.आप्पासाहेब खोत ( कथाकथनकार)
विषय- कथाकथन
अध्यक्ष – रामदास काकडे ( उद्योजक )
प्रमुख पाहुणे – मुबारक शेख (अध्यक्ष – गोदान, पसायदान विश्वजागृती धर्मादाय संस्था )

शुक्रवार दि.20 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते – मिलिंद जोशी ( कार्याध्यक्ष – महाराष्ट्र साहित्य परिषद )
विषय – जीवनातील विनोदाचे स्थान
अध्यक्ष- रवींद्र भेगडे ( संस्थापक – मावळ प्रबोधिनी )
प्रमुख पाहुणे- गणेश खांडगे ( अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस, मावळ )

शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते- राम नाईक (मा. राज्यपाल )
विषय – मी कसा घडलो
अध्यक्ष- श्रीरंग बारणे
खासदार, मावळ लोकसभा
प्रमुख पाहुणे – बाळासाहेब जांभूळकर – ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक

रविवार दि.22 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते- सत्यजित तांबे ( आमदार विधानपरिषद )
विषय – भारताची खरी गरज -आर्थिक व राजकीय साक्षरता
अध्यक्ष- संजय उर्फ बाळा भेगडे ( मा.मंत्री, महाराष्ट्र राज्य )
प्रमुख पाहुणे – संतोष राऊत
( मानव संसाधन विभाग प्रमुख जेसीबी )

सोमवार दि.23 ऑक्टोबर 2023
प्रमुख वक्ते- कवि राजू उगले आणि अरुण इंगळे
विषय – मायबाप.एक कृतज्ञता आई वडिलांबाबत..
( कवी संमेलन )
अध्यक्ष- सुनील शेळके ( आमदार , मावळ )
प्रमुख पाहुणे- विक्रम देशमुख – तहसीलदार मावळ,
विठ्ठल वाघ ( लोककवी, गीत, पटकथा लेखक )

याप्रमाणे व्याख्यानमाला नियोजन असून मंगळवार दि. 24 ऑक्टोबर 2023, सायंकाळी 5 वाजता, विजयादशमी,दसरा निमित्त भारत माता प्रतिमेची भव्य मिरवणुक, श्री.खंडोबा मंदिरापासून सुरू होईल.

दररोज एका भाग्यवान श्रोत्यास मे.हर्षलकुमार सुमतिलाल बाफना ज्वेलर्स तर्फे लकी ड्रॉ द्वारे चांदीचे नाणे भेट दिले जाणार आहे.


विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा 

सरस्वती व्याख्यानमालेच्या माध्यमातून खाली नमूद केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
सुधीर म्हाळसकर,भाऊसाहेब पवार, दिपाली चव्हाण,अभिषेक काजळे, सानिका काजळे,सेजल मोईकर, ॲड.केशव मगर,गिरीश खेर,सुकन बाफना,विश्वासराव भिडे.

वैद्यकीय शिबिराचे आयोजन 
कार्यक्रम स्थळी
शनिवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये इसीजी,मधुमेह तपासणी, रक्त दाब, हिमोग्लोबिन,बी एम आय या तपासण्या केल्या जातील

रक्तदान शिबिर 
रविवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.


मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य,अध्यक्ष श्रीराम ढोरे,कार्याध्यक्ष अर्चना कुडे,कार्यक्रम प्रमुख सारिका भिलारे, उपाध्यक्ष प्रतीक भालेराव, सचिव / मा.नगरसेवक श्रीधर चव्हाण,

खजिनदार / मा.नगरसेवक रवींद्र म्हाळसकर आणि सर्व संयोजन समिती सदस्यांच्या नियोजनातून व्याख्यानमाला ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगण,वडगांव मावळ येथे दररोज सायंकाळी 6.30 वा. संपन्न होणार आहे अशी माहिती आयोजकांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.