कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वतीने ‘एकोणनव्वद (कवीकट्टा)’  कविता संग्रहाचा रसिकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 या संमेलनातून कवीकट्टा या व्यासपीठावर सादर झालेल्या कवितांमधून परीक्षकांद्वारे निवडलेल्या 89 कवितांचा संग्रहाचे प्रकाशन  होणार आहे, हा सोहळा मंगळवारी (दि. 28) पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल ऑडिटोरियम येथे  दुपारी 4 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस  यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील असणार आहेत.

यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक रामचंद्र देखणे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलींद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहे, अशी माहिती कवी कट्टाचे अध्यक्ष राजन लाखे व समन्वयक सचिन इटकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.