Pune : इंटरनेट केबलमुळे महापारेषणच्या टॉवर लाईन मध्ये बिघाड, पुणे शहरात काही ठिकाणी तासभर वीजपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज –  धायरी मधील आनंद विहार येथे महापारेषणच्या 220 केव्ही अतिउच्च ( Pune ) दाब वीज वाहिनीला गुरूवारी (दि. 28) दुपारी दीड वाजता इंटरनेट केबलचा स्पर्श झाल्याने नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्रातील 50 एमव्हीए पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे विजेची तूट भरून काढण्यासाठी महापारेषणची स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (Load Trimming Scheme- LTS) कार्यान्वित झाली. परिणामी पुणे शहरातील वडगाव धायरी, नऱ्हे, हिंगणे, कोथरूड, जुनी सांगवी, पद्मावती, धनकवडी, कात्रज, आंबेगाव आदी परिसरातील सुमारे 3 लाख 9 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित झाला होता.

Nigdi : ओटास्कीम येथे रिक्षा जळून खाक

याबाबत माहिती अशी की, आनंदविहार येथे इंटरनेट केबल टाकण्याच्या प्रयत्न सुरु होता. त्याच ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या 220 केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीला आज दुपारी दीड वाजता या इंटरनेट केबलचा स्पर्श झाला. त्यामुळे मोठा आवाज होऊन वीजवाहिनीद्वारे होणारा नांदेड सिटी 220 केव्ही उपकेंद्रातील 50 एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर चा वीजपुरवठा खंडित झाला. यात सुमारे 60 मेगावॅट विजेची तूट निर्माण झाल्यामुळे भारत व्यवस्थापनासाठी महापारेषणचे स्वयंचलित एल टी एस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे पर्वती 220 केव्ही, नांदेड सिटी 220 केव्ही, कोंढवा (येवलेवाडी) 220केव्ही तसेच कोथरूड 132 केव्ही व एनसीएल132 केव्ही या अतिउच्चदाब उपकेंद्रातून भार व्यवस्थापन करण्यात आले.

महापारेषणच्या या पाचही अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांतील भार व्यवस्थापनामुळे महावितरणच्या विविध उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी वडगाव, धायरी, नऱ्हे, किरकीटवाडी, सिंहगड रस्ता, सनसिटी रस्ता, हिंगणे, पद्मावती, मार्केटयार्ड, कात्रज, आंबेगाव, धनकवडी, जुनी सांगवी, शितोळेनगर, आनंदनगर, एरंडवणे, डहाणूकर कॉलनी या परिसरातील सुमारे 3 लाख 9 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी दोन च्या सुमारास  खंडित झाला. महापारेषणच्या अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी तातडीने आनंदविहार येथे जाऊन अतिउच्चदाब वीजवाहिनीतील बिघाड दुरूस्त केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व परिसरातील वीजपुरवठा दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्ववत ( Pune ) करण्यात आला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.