Pimpri:  मराठी रसिकांचेच मराठी चित्रपटावर प्रेम कमी – मृणाल कुलकर्णी

पिं- चिं कल्चरल फौंडेशनकडून सौ. कुलकर्णी यांना कलाविभूषण पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – मराठीतील कला,साहित्य आणि संस्कृती समृद्ध असून ते प्रसिद्ध देखील (Pimpri)आहे. मराठी चित्रपट अमराठी रसिकांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे. अमराठी रसिक सब टायटल दिलेले मराठी सिनेमा आवडीने बघतात. मात्र मराठी रसिकांचे मराठी चित्रपटावर कुठेतरी प्रेम कमी पडत आहे.

 

अशी खंत प्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त  (Pimpri)केली. पिंपरी चिंचवड कल्चरल फाउंडेशन च्या वतीने सौ.कुलकर्णी यांना कलाविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान त्या बोलत होत्या.

 

यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, हभप शेखर महाराज जांभुळकर, माजी नगरसेवक नाना काटे, शत्रूघ्न काटे, पंढरपूरचे नगरसेवक विक्रम शिरसाठ, पं.रवींद्र गांगुर्डे, प्रयोजक संतोष काटे,धनंजय भिसे, गणेश भिसे,अरुण चाबूकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

दाक्षिणात्य चित्रपट भरभरून गल्ला करतो तसे मराठी चित्रपटाबाबतीत दिसून येत नाही.असा प्रश्न फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी मुलाखती घेताना सौ कुलकर्णी यांना विचारला असता त्या म्हणाल्या कि, पैसे खर्च करून थिएटरमध्ये सिनेमा बघायला जाण्याची रसिकांची तयारी नाही हे दुर्दैवी आहे.

 

मल्टीप्लेक्स मध्ये तीन प्रकारचे सिनेमे लागलेले असतात. त्यावेळी मराठी रसिक सर्वप्रथम हिंदी सिनेमा बघण्याला प्राधान्य देतो. नंतर एखादा पुरस्कार विजेता मग शेवटी मराठी बघू असे तो ठरवतो.मात्र शनिवार – रविवारला थिएटरमध्ये गर्दी नसेल तर तो सिनेमा चित्रपट गृहातुन दुसऱ्या हप्त्यात काढला जातो. आपण आपल्या मराठी सिनेमावर प्रेम करायला कुठेतरी कमी पडत आहोत. मात्र दाक्षिणात्य रसिक सर्वप्रथम मातृभाषेतल्या सिनेमाला प्राधान्य देत त्यांच्या भाषेतील सिनेमा सर्वप्रथम सिनेमा बघतात. त्यामुळे ते सिनेमे प्रचंड चालतात.

 

माझे आजोबा साहित्यिक गो.नी दांडेकर यांनी माझ्यावर साहित्य आणि इतिहासाचे संस्कार झालेत. ते आम्हाला गडकिल्ले भ्रमंती करायला घेवून जायचे. याचा उपयोग मला ऐतिहासिक भूमिका साकारताना आणि दिग्दर्शन करताना झाला. आपण देखील आपल्या मुलांसोबत ऐतिहासिक स्थळाना भेटी दिल्या पाहिजेत.
सेलिब्रेटी आयुष्य जगताना मला कुटुंब आणि सतत रसिकांसमोर राहणे हि तारेवरची कसरत असते. आज वेबसिरीजमुळे कोणताही विषय हाताळता येतो.
कुटूंबासोबत मला चित्रपट बघता यावा असेच साचेबद्ध आणि मला आवडेल अशा भूमिका साकारण्याचे मी ठरवले होते.त्यात मला जिजामाता यांची भूमिका मला प्रचंड भावली.

 

Maval LokSabha Elections 2024 : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी वाघेरे यांच्या प्रचारात सक्रिय

मला जे आवडतील असे विषय समाजापर्यंत पोचवण्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रात उतरले.अशा प्रकारे रसिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत मुलाखत संपली.

 

प्रभुणे म्हणाले कि, मृणाल कुलकर्णी यांचे आजोबा गो.नी दांडेकर यांचे माझ्यावर ऋण आहे. दांडेकर यांचा सहवास लाभला हे थोरच.नाट्य,कला, साहित्य अशा वातावरणात अभिनेत्री म्हणून घडल्या. गायकीच्या घराण्यासारखे हे घराणे तयार झालेत. फौंडेशनच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात विजय भिसे हे उगवते नेतृत्व तयार झालेत.
हभप जांभूळकर महाराज म्हणाले कि, सौ कुलकर्णी यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल. अशी आहे. अशा शब्दांत कौतुक केले.

 

शत्रुघ्न काटे म्हणाले कि, शहरातील सांस्कृतिक भूक भागविण्याचे कार्य भिसे हे फौंडेशनच्या माध्यमातून करित आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले आणि ओमकार दीक्षित यांनी तर आभार सतीश इंगळे यांनी मानले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.