Pune: मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार – मुरलीधर मोहोळ 

एमपीसी न्यूज -मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा (Pune)कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, उद्योग व्यवसायांना गती मिळणार असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
मोहोळ यांच्या प्रचारार्थ पर्वती मतदारसंघात तुळशीबाग कॉलनी, तळजाई वसाहत, (Pune)चव्हाण नगर, पद्मावती, शिवदर्शन परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, श्रीनाथ भिमाले, करण मिसाळ, राजू शिळीमकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, अनिल जाधव, गणेश घोष, विशाल पवार, श्रुती नाझीरकर, विकास कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Pune: आत्मनिर्भर युवा पिढी घडविण्याचे ‘यशस्वी’ संस्थेचे कार्य कौतुकास्पद – श्रीरंग गोडबोले 

मोहोळ पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे भुयारी मेट्रो आणि स्वारगेटचे एसटी स्थानक एकमेकांशी जोडले जाणार आहे. मेट्रोच्या मल्टिमोडल हबमध्येच पीएमपीचे राजश्री शाहू बस स्थानक होणार आहे.

 

कुठूनही कुठे जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी मिळणार आहे. हबमध्ये व्यावसायिक जागा विकसित केल्या जाणार आहे. मॉल, मल्टिफ्लेक्स आणि इतर व्यवसायासाठी जागा दिली जाणार. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.