Pune : इव्हीएमवर कमळाचं फुल दिसत नसल्याने संतापले आजोबा ; धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदाना दरम्यानचा प्रकार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघासाठी ( Pune ) आज मतदान होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आणि पुणे शहराशी संलग्न असलेल्या भागातील नागरिकांनी सकाळपासूनत मतदान केंद्रावर जात मतदान करायला सुरुवात केली आहे. मात्र, महायुती आणि महाविकासआघाडीतील असलेल्या वेगवेगळ्या पक्षांमुळे मतदारांचा गोंधळ होत आहे.

अशाच एका आजोबांचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या काकांना बहुतेक भाजपला मतदान करायचं होतं. मात्र, इव्हीएमवर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानादरम्यान घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा हक्क

बारामतीत यावेळी महायुती आणि महाविकासआघाडी अशी लढत आहे. महायुतीचा उमेदवार यावेळी राष्ट्रवादीच्या सुनेञा पवार असून त्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तर, महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणूक लढवत आहे. मात्र, महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचं चिन्हं घड्याळ असल्याने आजोबांना इथे भाजपचं चिन्हच दिसलं नाही. यामुळे आजोबा ( Pune ) संतापले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.