पुण्यात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या नावाखाली पैसे मागणारे गजाआड
एमपीसी न्यूज- अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्या आणि न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघाजणांच्या विरोधात मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दादा वाल्हेकर, सचिन वाल्हेकर आणि गोट्या मुळे (रा. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे) अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी जितेंद्र रघुनाथ शिंदे (वय ३४, रा. ५२५ वनराज मंडळ, शिवाजी रास्ता पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, २६ जुलै रोजी वरील तिघाजणांनी जितेंद्र शिंदे याना समक्ष भेटून आणि फोनवरून शिवीगाळ करून अण्णाभाऊ जयंतीच्या नावाखाली पैसे मागितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. जी. खरात करीत आहेत.