Chinchwad : सायन्स पार्कमध्ये विज्ञान विषयावर शनिवारी व्याख्यान
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि मराठी विज्ञान परिषद यांच्यावतीने शनिवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजता विज्ञान व्याख्यान आणि शास्त्रीय संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील सायन्स पार्कच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. त्यात भारतीय अवकाश, संशोधन संस्थेचे निवृत्त अधिकारी डॉ. अरुणकुमार सिन्हा यांचे भारताचा अंतराळ प्रवास – इस्त्रोया विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर रामेश्वर डांगे यांचे शास्त्रीय गायन होईल. कार्यक्रमासाठी प्रवेश मोफत असून जागा मर्यादित आहेत.