Ambi : झोनल नासा-अॅनामोलीचा जल्लोषात समारोप

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रभरातल्या 40 आर्किटेक्चर काँलेजमधील जवळजवळ बाराशे विद्यार्थ्यांच्या सहभागातून झोनल नासा- अॅनामोली-2018 या वार्षिक संमेलनाचा समारोप करण्यात आला. डी.वाय.पी. स्कूल आँफ आर्किटेक्चर, आंबी येथे या वार्षिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. बंगळुरूचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ, आर्कि. अनंतकृष्णा यावेळी उपस्थित होते.

आर्किटेक्चर शिक्षणशाखेतल्या शिक्षण, सद्यस्थिती आणि विविध पैलूंवर त्यांनी भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आणि त्यांच्यातील कलागुण, निर्णयक्षमता, नेतृत्वगुणांच्या विकासात ” नासा” या वार्षिक संमेलनाचे अतिशय महत्वाचे योगदान आहे हे त्यांनी आग्रहाने नमूद केले. डिवायपी स्कूल आँफ आर्किटेक्टर, आंबी सारख्या अतिशय नवीन कॉलेजने नासाचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

तत्पूर्वी, शुक्रवारी (दि. 7) या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन औरंगाबादचे सुप्रसिद्ध आर्कि. अजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, व्यवस्थापकीय विश्वस्त शिवानी पाटील, नेरूळ व आंबी कँम्पसमधील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

या वर्षापासून महाविद्यालयात नव्याने सुरू होणाऱ्या ‘एम. आर्च.- एन्व्हिराँन्मेटल आर्किटेक्चर’ या अभ्यासक्रमाच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून या अभ्यासक्रमाची औपचारिक सुरूवात केली. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या या राज्यस्तरीय संमेलनात विविध विषयांवरच्या कार्यशाळा, व्याख्याने, स्पर्धां आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आर्कि. प्रमोद बेरी ( कोल्हापूर), आर्कि. सोनाली फडके, आर्कि. अनुज काळे ( नासिक) , आर्कि. टी. सागर ( बंगळुरू), आर्कि. जान्हवी घोषपुरीकर, आर्कि. विवेक महाजन, अभिजीत सौमित्र, आर्कि. हिमांशू पटेल, आर्कि. अक्षय आनंद (अहमदाबाद) नाट्यकर्मी आनंद चाबुकस्वार, आर्कि. नाईक ( दिल्ली), आर्कि. अक्षयदीप, केतकी करमरकर, आर्कि. शब्बीर उनावाला (लोणावला), आर्कि. विजय पवार, आर्कि. अमोल देशमुख (नासिक) आर्कि. रोहित राका, आर्कि. पंकजा बागूल, आर्कि. योगेश मल्हारकर व हिन्दी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध छायाचित्रकार महेश लिमये या विविध क्षेत्रातील तज्ञांचे या शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसादात या कार्यशाळा, व्याख्यान आणि स्पर्धा पडल्या.

सर्वाधिक बक्षिसे जिंकून सिंहगड काँलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे विजेते ठरले आणि एम.व्ही.पी. काँलेज आँफ आर्किटेक्चर, नासिक उपविजेते ठरले. विजेत्यांचे डॉ. अनंतकृष्णा व प्राचार्या डॉ. उमा जाधव यांनी अभिनंदन केले आणि या संपूर्ण कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आणि घेतलेल्या अथक परिश्रमांबद्दल डीवायपी स्कूल आँफ आर्किटेक्चर, आंबीच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

या संपूर्ण कार्यक्रमाला डीवायपीटीसी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील व व्यवस्थापकीय विश्वस्त शिवानी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.