Pimpri : हिंजवडीतील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पिंपरीत आंदोलन 

एमपीसी न्यूज – चार दिवसापूर्वी हिंजवडी येथील ऊसतोड  कामगारांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (शुक्रवारी) पिंपरीत आंदोलन करण्यात आले. आरोपींना त्वरित शिक्षा देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

चार दिवसांपूर्वी हिंजवडी येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करुन याचा निषेध केला.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, कविता खराडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, पौर्णिमा पालेकर, शिल्पा बिडकर, आशा शिंदे, शमा कोरबू, मिना कोरडे, सुप्रिया पवार , सविता धुमाळ, मंगल ढगे, निर्मला माने, विजया काटे, बाळासाहेब पिल्लेवार, सर्जेराव जगताप, यतिन पारेख, रंजना कराळे, हमीद शेख, विजय दळवी आंदोलनात सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.