Bhosari : दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघां गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज – खुनाच्या प्रयत्नातील तीन गुन्हेगार दोन वर्षांपासून फरार होते. या गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आज (मंगळवारी) मध्यरात्री अटक केली.

शंकर शाम माने (वय 20), लक्ष्मण नामदेव माने (वय 24, दोघे रा. गणेशनगर, टेल्को रोड, भोसरी), सोमनाथ नागनाथ माने (रा. उरुळी देवाची, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पथक परिमंडळ एकच्या हद्दीत आज मध्यरात्री गस्त घालत असताना तीन संशयित आरोपी आढळून आले. पोलिसांनी तिघांकडे चौकशी केली असता ते तिघेही एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे आढळून आले. त्यावरून त्यांना अटक करत पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.