Pimpri: पाच उच्चशिक्षित सराईत गुन्हेगारांकडून नऊ पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने उच्चशिक्षित सराईत गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे नऊ पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा सात लाख 27 हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 
अमोल सुर्यभान लेंडवे (वय 30, रा. इंद्रलोक कॉलनी, भोसरी) सोमनाथ कैलास चव्हाण (वय 31, रा. रोहा, रायगड), अक्षय उर्फ सागर अरुण टिळेकर ( वय 22, रा. दौड)  सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे ( वय 25, रा. थेऊर, हवेली, पुणे)  आणि पिस्तुल विक्री करणाऱ्या तुषार राजराम सोंडकर (वय 28, रा. दिडघर, नसरापूर, ता. भोर) अशा पाच जणांना अटक केले आहे.

अमोल लेंडवे याला पोलिसांनी  सापळा रचत  25 नोव्हेंबर रोजी हिंजवडी येथून बेकायदेशीररीत्या पिस्तुल विक्री करता आला असताना ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडे बेकायदेशीर पिस्तुल व जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे पिस्तुलाबाबत कसून चौकशी केली.  त्या वेळी त्याने आपला मित्र अक्षय याच्या ओळखीने एजेंट तुषार यांच्याकडून विकत आणल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तुषार याला भोर तालुक्यातील नसरापूर येथून ताब्यात घेतले . त्याच्याकडे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. तसेच त्याच्या हॉटेलमध्ये 4 देशी बनावटीचे पिस्तुल आणि 6 जिवंत काडतुसे सापडली.
आरोपी तुषार यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपी सोमनाथ, अक्षय, सुनील यांनाही एक पिस्तुल व काडतुसे विकल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ, अक्षय आणि सुनील या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन देशी बनावटीचे पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपी अमोल लेंडवे ,सुनील वाघमारे आणि अक्षय टिळेकर हे तिघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे, पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.