Maval : प्रचाराच्या धामधुमीत जेव्हा अजित पवार अन श्रीरंग बारणे एकाच व्यासपीठावर येतात तेंव्हा…..

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू असताना आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे वडील अजित पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे एकाच व्यासपीठावर आल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

मावळ मधील कान्हे फाटा येथे रवींद्र भेगडे यांच्या वतीने आज (बुधवारी) दोनशे पस्तीस जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे उपस्थित होते. त्यांच्यासोबत मावळचे आमदार बाळा भेगडे उपस्थित होते.

अजित पवार यांनी स्थानिक आमदार बाळा भेगडे यांच्याशी सात-आठ मिनिटे चर्चा केली. यावेळी युतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणेही शेजारीच होते. पण अजित पवार यांनी बारणे यांच्याशी बोलणं टाळलं. पण बारणे यांना टाळून बाळा भेगडे यांच्याशी पवार यांनी केलेल्या चर्चेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.