Chakan : कारची दुचाकीला धडक; वृद्ध महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या कारने समोरील दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 3) दुपारी बाराच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रोडवर बहुळ गावाजवळ झाला.

अनुसया सोपान वाडेकर (वय 75) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. शहाजी सोपान वाडेकर (वय 40) हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार विठ्ठल मारुती कुंभार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मारुती कमलाकर वाडेकर (वय 28, रा. सिद्धेगव्हाण, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी त्याच्या कार (एम एच 14 / डी एफ 0534) मधून शिक्रापूर-चाकण रोडने जात होता. आरोपीने रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात कार चालवून एम एच 14 / एच एस 1721 या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकी चालविणार्‍या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. तर दुचाकीवरील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

अपघातानंतर आरोपी घटनास्थळी न थांबता निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.